वृत्त संस्था/ नॉर्विच
प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया नॉर्विच सिटी फुटबॉल क्लबच्या मुख्य प्रशिक्षकपदी डीन स्मिथची नियुक्ती करण्यात आली आहे. डीन स्मिथ यापूर्वी ऍस्टोन व्हिलाचे बॉस म्हणून ओळखले जात होते.
प्रीमियर लीग फुटबॉल हंगामासाठी नॉर्विच सिटी फुटबॉल क्लबच्या प्रमुख प्रशिक्षकपदाची सूत्रे डीन स्मिथकडे सोपविण्याचा निर्णय या क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी घेतला. आठ दिवसापूर्वी डीन स्मिथ यांनी ऍस्टोन व्हिला फुटबॉल क्लबला निरोप दिला होता. आता नार्विच सिटी आणि डीन स्मिथ यांच्यात अडीच वर्षांचा नवा करार झाला आहे. प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेच्या गुणतक्त्यात नॉर्विच सिटीचा फुटबॉल संघ केवळ पाच गुणांसह तळाच्या स्थानावर आहे.