प्रतिनिधी /पणजी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या दि. 11 फेब्रुवारी रोजी भाजपच्या प्रचारार्थ गोव्यात येणार असून त्यांची म्हापसा येथे बोडगेश्वर मैदानावर विराट सभा होणार आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुंबईत पंतप्रधानांशी यासंदर्भात चर्चा केली असून पंतप्रधानांनी त्यांच्याकडे गोव्यातील निवडणूक संदर्भात सखोल चौकशी केली. भारतीय जनता पार्टीने पंतप्रधानाची एक सभा गोव्यात व्हावी असा आग्रह धरला होता. मुख्यमंत्री सावंत यांच्या विनंतीला पंतप्रधानांनी अखेर होकार दिला असून त्यानुसार ही सभा 11 फेब्रुवारी रोजी होईल. दि. 12 रोजी गोव्यातील विधानसभा निवडणूक प्रचाराची सांगता होईल.