प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व ग्रामीण भागात दरवषी महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात घरगुती गणेश मूर्ती आणण्यात येतात. परंतु यावषी या गणेशमूर्तींवर मर्यादा आल्या आहेत. कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे 50 टक्केच मूर्ती तयार स्थितीत आहेत. यामुळे यावषी महाराष्ट्रातून कमी प्रमाणात गणेशमूर्ती दाखल झाल्या आहेत. यामुळे स्थानिक मूर्तिकारांवरचा भार यावषी वाढणार आहे.
बेळगाव शहर व परिसरात 70 ते 80 नोंदणीकृत गणेशमूर्ती विपेते आहेत. हे विपेते बेळगावच्या स्थानिक मूर्तिकारांबरोबरच महाराष्ट्रातून मूर्ती आणून विक्री करतात. दरवषी महिना-दोन महिने अगोदरच मूर्ती विक्रीसाठीचा उत्साह असतो. परंतु यावषी गणेशोत्सव अवघ्या महिनाभरावर येऊनही तितकासा उत्साह दिसून येत नाही. श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर गणेशमूर्तींचे बुकिंग सुरू होईल, असा विपेत्यांना विश्वास आहे.
ई-पास घेऊनच गणेशमूर्तींसाठी प्रवास
बेळगावमधून गणेशमूर्ती आणण्यासाठी पेण, पनवेल व कोल्हापूर या ठिकाणी जाणाऱयांना ई-पास सक्तीचा करण्यात आला आहे. त्यामुळे विपेत्यांना प्रथमत: हा पास काढून त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये मूर्ती खरेदीसाठी जावे लागत आहे. परंतु तेथेही कोरोनाचा धोका असल्यामुळे अनेक निर्बंध घातले जात आहेत. त्यामुळे यावषी महाराष्ट्रातील गणेशमूर्ती नकोच, असा सूर विपेत्यांमधून उमटू लागला आहे.
60 टक्के मूर्ती कोल्हापुरातून
बेळगाव जिल्हय़ामध्ये दरवषी 60 टक्के गणेशमूर्ती कोल्हापुरातून आणल्या जातात. कोल्हापुरातील कुंभार वाडय़ात या गणेशमूर्ती तयार केल्या जातात. यावषी तेथेही कामगारांची संख्या कमी असल्यामुळे गणेशमूर्तींचे काम अजून अपूर्ण आहे. 500 मूर्तींची ऑर्डर दिल्यानंतर 300 मूर्ती विपेत्यांना दिल्या जात आहेत. यावर्षी गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होणार असल्यामुळे लहान घरगुती गणेश मूर्तींना मागणी अधिक असल्याचे विपेत्यांनी सांगितले.
स्थानिक मूर्ती विक्री करण्याकडे कल
महेश दळवी (अध्यक्ष, श्री गणेश विपेते संघटना)
दरवषी बेळगावबरोबरच कोल्हापूर व पेण येथून गणेशमूर्ती शहरात विक्री केल्या जातात. परंतु यावषी महाराष्ट्रातील गणेशमूर्तींची संख्या कमी झाली आहे. विपेत्यांना ई-पास घेऊनच महाराष्ट्रात जावे लागत आहे. त्यामुळे यावषी स्थानिक मूर्तिकारांकडून मूर्ती खरेदी करून विक्री करण्याकडे कल जास्त असल्याचे त्यांनी सांगितले.