लसीचे दोन डोस घेतल्यानंतरच प्रतिकारशक्ती वाढेल : मोहिमेच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांची माहिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशभरात बहुप्रतीक्षित कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ झाला. यावेळी पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केले. आपले डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, आरोग्य सेवेतील कर्मचारी यांना सर्वात आधी लस दिली जाईल. या सगळय़ांचा लसीवर पहिला हक्क आहे. त्यानंतर अत्यावश्यक सेवा आणि कायदा सुव्यस्थेची जबाबदारी असणाऱया लोकांना लस दिली जाईल, असे मोदींनी उद्घाटनप्रसंगी स्पष्ट केले.
जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम भारतात सुरू झाली आहे. यासाठी मी देशवासीयांचे अभिनंदन करतो, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेणे अत्यावश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱया डोसमध्ये जवळपास एका महिन्याचे अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर 2 आठवडय़ांनी आपल्या शरीरात कोरोना प्रतिबंधात्मक शक्ती निर्माण होईल, असेही पंतप्रधानांनी सांगितले. पहिल्या आणि दुसऱया लसीचा डोस घेण्यामध्ये एक महिन्याचा वेळ लागतो. लस मिळाल्यानंतरही तुम्ही बिनधास्तपणे वागू नका, मास्क वापरणे सोडू नका, सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडू नका. लस घेतल्यानंतर सुद्धा हे नियम कायम राहणार आहेत, असेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
लसनिर्मिती करणाऱयांचे कौतुक
देशाता आता कोरोना लसीकरण आता सुरू झाले आहे. संपूर्ण देशातील लोकांचे मी अभिनंदन करतो. कोरोनावर लस तयार करण्यासाठी संशोधकांसह वैद्यकीय तज्ञांनी जीवाचे रान केले. गेल्या आठ-दहा महिन्यांच्या आव्हानात्मक काळात त्यांनी सण-उत्सवही पाहिले नाहीत. लस तयार करण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. पण, अवघ्या काही महिन्यात संशोधकांनी लस प्रत्यक्षात आणली आहे. आता मेड इन इंडिया असलेल्या दोन लसी उपलब्ध झाल्या आहे, असे कौतुकही मोदींनी केले.
दुसऱया टप्प्यात 30 कोटी नागरिकांना लस
इतिहासात इतक्मया व्यापक स्वरूपातील लसीकरण यापूर्वी कधीही झाले नाही. जगात 100 पेक्षा अधिक देश असे आहेत की, ज्यांची लोकसंख्या 3 कोटींपेक्षा कमी आहे. तर दुसरीकडे भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी कोविड योद्धय़ांना लस देण्यात येईल. त्यानंतर दुसऱया टप्प्यात 30 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येईल. ज्ये÷ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दुसऱया टप्प्यात लस दिली जाईल, असेही मोदी यांनी स्पष्ट केले.
लस घेणारी पहिली व्यक्ती
भारतात सर्वप्रथम दिल्लीतील एम्समधील सफाई कर्मचारी मनीष कुमार यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. त्यानंतर प्रतिक्रिया देताना मनीष कुमार यांनी पहिल्यांदा कोरोना लस घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच या लसीबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नसल्याचेही स्पष्ट केले.