ऑनलाईन टीम / इस्लामाबाद :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. पाकिस्तान मध्ये देखील दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. पाकिस्तानमध्ये हा आकडा एक लाखाच्या जवळपास येऊन पोहचला आहे. मागील चोवीस तासात 4960 नवे कोरोना रुग्ण आढळले असून कोरोनामूळे 67 जणांनी आपला जीव गमावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका दिवसात 4960 रुग्ण वाढल्याने पाकिस्तानातील एकूण रुग्ण संख्या 98 हजार 943 वर पोहचली आहे. तर आता पर्यंत 2 हजार 02 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आता पर्यंत 33,465 रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
आता पर्यंत आढळलेल्या 98 हजार 943 मधील सिंध मध्ये आता पर्यंत 36, 364 रुग्ण, पंजाब मध्ये 37,090 , खैबर – पख्तूनख्वामध्ये 13 हजार 01 बलूचिस्तानमध्ये 6,221, इस्लामाबाद मध्ये 4,979, गिलगित – बाल्टिस्तानमध्ये 927 आणि पाकिस्तानच्या कब्जातील काश्मीरमधील 361 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे येथील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये भयानक परिस्थिती निर्माण झाली असली तरी देखील पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कडक निर्बंध घालण्यास नकार दिला आहे.