प्रतिनिधी /फोंडा
पाटणतळी-बांदोडा येथे मालवाहू मिनी कंटेनर रस्त्याच्या मधोमध कलंडला. सुदैवाने जिवीतहानी टळली असली तरी क्लिनर किरकोळ जखमी झाला, चालक सुखरूप बचावला. रामा गौडा (32, नागझर कुर्टी) असे जखमी क्लिनरचे नाव आहे. सदर अपघात काल बुधवारी सायंकाळी 6 वा. सुमारास घडला. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिनी कंटेनर जीए 05 टी 5598 पाटणतळी बांदोडा येथून फोंडय़ाच्या दिशेने येत होता. खड्डयाच्या बचाव करताना चालकाचा ताबा गेला व कंटेनर पादचारी मार्गावर धडक दिल्याने कलंडला. सुदैवाने यावेळी जिवीतहानी टळली असली तरी क्लिनर किरकोळ जखमी झाला. जखमीला फोंडा उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून हवालदार सुरज गावडे अधिक तपास करीत आहे.