प्रतिनिधी/ पणजी
राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाबाबतची अधिसूचना राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जारी केली असून 27 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ होणार आहे. हे दहा दिवसांचे राहील.
7 ऑगस्टपर्यंत अधिवेशन चालणार आहे. विधानसभा अधिवेशन दोन आठवडय़ांचे असेल असे सभापती राजेश पाटणेकर यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये अधिवेशन घेण्यात आले होते. घटनेनुसार दोन अधिवेशनांमध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी जाता कामा नये. त्यामुळे जुलैमध्ये अधिवेशन निश्चित केले आहे.