ऑपरेशनंतर पित्ताशयाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. तेलकट, तूपकट आहाराचे सेवन केल्याने अतिसार किंवा पोट फुगण्याची समस्या निर्माण होऊ शकते. शस्त्रक्रियेनंतर आहार कसा करावा, हे जाणून घेऊ.
ङकमी तेलकट आहार : शस्त्रक्रियेनंतर अधिक तेलकट आहार केल्यास पचनाला अडचणी येऊ शकतात. त्यामुळे कमी फॅट असणारे पदार्थ जसे की भाजीपाला, डाळी, फळांचे सेवन करायला हवे. अन्य पदार्थात फायबर आढळून येतात आणि ते अतिसारापासून बचाव करतात. त्यामुळे आपल्या आहारात ब्रोकोली आणि स्वीट पोटॅटोसह फायबरयुक्त भाजीपाल्यांचा समावेश करावा. त्याचबरोबर अधिक गोड फळे खाण्याचे टाळावे.
ङआहार हलका असावा : ऑपरेशननंतर डॉक्टर आपल्याला हलके आणि सॉफ्ट फूड खाण्याचा सल्ला देतात. यादरम्यान आपण अधिकाधिक पातळ पदार्थ घ्यायला हवेत. हलके आणि सॉफ्ट फूडमुळे पचनक्रिया चांगली राहते. उकडलेले बटोटे, केळ, पांढरा भात आदींचा आहार करावा. कालांतराने आहारात बदल करावा.
ङसाखरेपासून दूर रहा : जर आपल्याला गोड पदार्थ आवडत असतील तर ऑपरेशननंतर या गोष्टीपासून दूर राहणे गरजेचे आहे. आईस्क्रीम, पेस्ट्री, कुकीज, डोनट वर्ज्य करावे. डॉक्टरांचा सल्ला मिळेपर्यंत या आहाराचा मोह टाळावा.
ङकॅफिन आणि अल्कोहोलपासून दूर राहा : ऑपरेशननंतर सोडा, कॅफिन आणि अल्कोहोलपासून चार हात दूर राहा. त्याचबरोबर ज्यूस आणि अन्य पेय घेण्याचे टाळा. याशिवाय पिपरमिंट चहाचे सेवन करा.
ङपुरेसे पाणी प्या : दररोज पुरेशा प्रमाणात पाणी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे तब्येतीत लवकर सुधारणा होते. आपल्या शरिराला हायड्रेट ठेवा. जर आपण पुरेसे पाणी घेत नसाल तर जीवनसत्त्व आणि खनिजयुक्त पेय पदार्थाचे सेवन करावे. या आहाराबरोबरच प्रोटिनयुक्त खाद्य पदार्थाचा आहारात समावेश करावा.यामुळे शस्त्रक्रियेनंतर तब्येतीत लवकर सुधारणा होण्यास मदत मिळेल.
– डॉ. संजय गायकवाड