सरकारी कार्यालयातही शुकशुकाट
प्रतिनिधी / पेडणे
सरकारने जाहिर केलेल्या ला?कडाऊनचा परिणाम शुक्रवारी पेडणे बाजारपेठेत दिसून आला. दुकाने बंद ठेवण्यात आल्यानेस पेडणे बाजारपेठेत शुक्रवारी सकाळी किरकोळ नागरिकांची वर्दळ होती,माञ दुपारी आणि सायंकाळी बाजारपेठेत शुखशुकाट होता.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेत नागरिकांनी बाजारपेठेत येण्याचे टाळले. दोन तीन हा?टेल वगळता बहूतेक आणि किराणा मालाची आस्थापने बंद होती. पेडणे हे तालुक्मयाचे मुख्य ठिकाण असल्याने या ठिकाणी नागरिक आपल्या कामानिमित्ताने येत असतात माञ ला?कडाऊन जाहिर झाल्याने शुक्रवारी नागरिकांनी बाजारपेठेत येण्याचे टाळले.
पेडणेतील सरकारी कार्यालयातही शुकशुकाट
पेडणेतील सरकारी कार्यालयात शुक्रवारी 50 टक्के कर्मचाऱयांनी हजेरी लावली.माञ या कार्यालयात नागरिक न आल्याने कार्यालये सुनी सुनी वाटली.
मासे मार्केटमध्येही शुकशुकाट
पेडणेतील मासे मार्केटमध्ये शुकशुकाट होता.मासे विपेते न आल्याने मासे मार्केट बंदच होते.
पेडणे बसस्थानकावरही शुकशुकाट
पेडणे बसस्थानकावरस आज खाजगी बससेवा नसल्याने शुकशुकाट दिसून आला. कदंबा बससेवा वगळता पेडणेत बसेच बंदच ठेवण्यात आल्या.
पेडणे तालुक्मयातील विविध पंचायत क्षेत्रात माञ नागरिक आपल्या कामासाठी तसेच दुकानातील वस्तू खरेदी करण्यासाठी घरा बाहेर पडत असल्याचे चिञ दिसले. दिवसेंदिवस वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाल्याने नगरिकांनी घराबाहेर जाण्याचे टाळल्याचे शुक्रवारी दिसून आले.