विजापूर नाका पोलिसांची कामगिरी
सोलापूर / प्रतिनिधी
भारतीय चलना सारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणारे रॅकेट विजापूर नाका पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पोलीस आणि दहा हजार 790 रुपयाच्या बनावट नोटा हस्तगत केल्या आहेत.
विष्णू सिद्राम गायधनकर ( वय 35,रा. भारत हौसिंग सोसायटी सदर बाजार सोलापूर,) व संजय धनु पवार ( वय 35, रा. कुमठा तांडा उत्तर सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी शंभर रुपयाच्या 610 व पाचशे रुपयाच्या 500 नोटा अशा एकूण अकराशे 10 नोटा कारवाईदरम्यान जप्त केल्या आहेत. तसेच नोटा स्थापना करिता लागणारे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.