आनंद महिंद्रांकडून छायाचित्र ट्विट – लोकांकडून मजेशीर प्रतिक्रिया
भारतातील दिग्गज उद्योगपती आनंद महिंद्राचे एक ट्विट सध्या व्हायरल झाले आहे. महिंद्रा हे समाजमाध्यमांवर मजेशीर ते जुगाडच्या जबरदस्त चित्रफिती आणि छायाचित्रे प्रसारित करत असतात. पण यावेळी त्यांनी अमेरिकेतील एक छायाचित्र प्रसारित केले आणि आम्ही ‘जुगाड’चा मान गमावणार तर नाही अशी चिंता व्यक्त केली. भारतीयांना जुगाड प्रकरणी पिछाडणे अवघडच नव्हे तर अशक्य असल्याचे त्यांचे मानणे आहे.
आनंद महिंद्रा यांनी संबंधित छायाचित्र प्रसारित करत लक्षवेधी ओळ त्याला जोडली आहे. ‘अमेरिकेच्या एका मित्राने हे छायाचित्र पाठविले. आमच्या ‘जुगाड’ चॅम्पियन होण्यावर धोका घोंगावू लागला आहे. एका बाइकला महिंद्रा लोडर जोडण्यात आला असून त्याला चालताना पाहणे रंजक ठरणार’ असल्याचे महिंद्रा यांनी नमूद केले आहे. महिंद्रा यांच्या ट्विटवर लोकांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. जुगाडमध्ये भारतीयांना हरविणे अशक्य असल्याचे काही जणांनी म्हटले आहे.