शनिवारपासून अर्ज प्रक्रिया सुरू : 20 रोजी निवडणूक
प्रतिनिधी /बेळगाव
प्रतिष्ठेची निवडणूक म्हणून बार असोसिएशन निवडणुकीकडे पाहिले जाते. ही निवडणूक कधी होणार? याची साऱयांनाच उत्सुकता लागली होती. अखेर बार असोसिएशनची निवडणूक जाहीर झाली असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. शनिवार दि. 6 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यात येणार आहेत. आता इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
अध्यक्षपदासाठी सध्या पाचजण तयारीला लागले आहेत. याचबरोबर उपाध्यक्ष, जनरल सेपेटरी, जाईंट सेपेटरी आणि सदस्य या पदांसाठी अनेक जण इच्छुक असून रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. यावषीही निवडणूक मोठय़ा चुरशीने होणार हे निश्चित झाले आहे.
वकील मतदारांची यादी मंगळवार दि. 2 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. शनिवार दि. 6 नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे. सकाळी 11 पासून दुपारी 4 पर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. बुधवार दि. 10 नोव्हेंबर रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. 10 नोव्हेंबर रोजीच सायंकाळी 5 ते 6 यावेळेत अर्जांची छाननी करून वैध अर्जांची नावे जाहीर होणार आहेत.
दि. 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 पर्यंत अर्ज माघार घेण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता अंतिम उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान होणार आहे. त्याचदिवशी सायंकाळी 6 नंतर मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. रात्री उशिराने निकाल लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून ऍड. संजय बी. टुबाची हे काम पाहणार आहेत.