बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व संपल्यानंतरही यातील स्पर्धकांची लोकप्रियता कमी झालेली नाही. सांगलीचा विशाल निकम याने बिग बॉसच्या तिसऱया पर्वाचे विजेतेपद मिळवले आहे. या कार्यक्रमामुळे विशालच्या चाहत्यांमध्ये आणि लोकप्रियतेमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच विशालबद्दल जाणून घेण्याबद्दल त्याच्या चाहत्यांना कायमच उत्सुकता असते.
विशालच्या फॅन पेजवर त्याने गाडी घेतल्याचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. त्यावर चाहत्यांनी भरभरून कमेन्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. बिग बॉस विजेता विशाल निकमच्या टीम विशाल निकम या फॅन पेजवर एक व्हिडीओ आणि फोटो शेअर केला आहे. विशाल निकमने नुकतंच टाटा हॅरियर ही कार खरेदी केली आहे. ही गाडी खरेदी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. त्याची नवीकोरी गाडी घेताना दिसत आहे.
विशालसोबत त्याचे बाबादेखील दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विशालच्या चेहऱयावरील आनंद दिसून येत आहे. विशालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.