हॉस्पिटलमधील भोंगळ कारभाराचा गरीब रुग्णांना बसतोय फटका
प्रतिनिधी /बेळगाव
निपाणी येथील एका रुग्णाची बिम्समध्ये परवड सुरू आहे. सायंकाळनंतर रक्त गरजेचे आहे असे सांगून जोवर रक्त मिळणार नाही तोवर उपचार होणार नाहीत, अशी उत्तरे रुग्णांना दिली जात आहेत. बिम्स हॉस्पिटलमधील भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य व गरीब रुग्णांना बसत आहे.
निपाणी तालुक्मयातील पडलिहाळ गावातील दीक्षा युवराज कांबळे यांच्या पायाला धनुर्वात (गँगरिंग) झाले आहे. पाच दिवसांपूर्वी बेळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांचे एमआरआय स्कॅनिंग करण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी त्यांना ए पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपचे रक्त आवश्यक आहे. शुक्रवारी सायंकाळी रुग्णाला रक्ताची आवश्यकता आहे, असे सांगण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँकेमध्ये रक्त शिल्लक नसल्यामुळे त्या रुग्णाच्या कुटुंबीयांना इतर ब्लड बँकांमध्ये धावपळ करावी लागली. फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, अवधूत तुडयेकर यांनी या कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे.