वृत्तसंस्था/ चेन्नई
44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आयोजन चेन्नईत होणार असून 28 जुलैपासून त्याची सुरुवात झाल्यानंतर 10 ऑगस्टला सांगता होणार असल्याचे फिडेने सांगितले.
आधीच्या नियोजनाप्रमाणे बुद्धिबळ ऑलिम्पियाड रशियामध्ये होणार होते. पण रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याने या स्पर्धेचे यजमानपद त्यांच्याकडून काढून घेत चेन्नईला ते स्पर्धा बहाल करण्यात आले. चेन्नईत होणारी बुद्धिबळातील ही दुसरी मोठी स्पर्धा आहे. यापूर्वी 2013 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप लढत येथे झाली होती. खुल्या व महिला विभागात एकूण 11 फेऱया होणार असून 2000 हून अधिक खेळाडू त्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे. फिडे कौन्सिलच्या अलीकडेच झालेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले, त्यावेळी ही स्पर्धा भारताला बहाल करण्याचा निर्णयही झाला होता. स्पर्धेवेळीच 94 वी फिडे काँग्रेस 31 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत अ.भा. बुद्धिबळ संघटना आयोजित करणार आहे. याचवेळी 7 ऑगस्ट रोजी फिडे निवडणूकही घेण्यात येणार आहे. या बैठकीत दिव्यांगांसाठीही बुद्धिबळ ऑलिम्पियाड भरविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) शिफारसीनुसाररशिया व बेलारुसवर फिडेच्या स्पर्धांत सहभागी होण्यास बंदी घालण्याचा निर्णयही या बैठकीत झाला आहे.