बेंगळूर/प्रतिनिधी
बेंगळूर हिंसाचार प्रकरणी माजी महापौर व नगरसेवक संपत राज यांचे पुतणे आणि वैयक्तिक सहाय्यक अरुण कुमार यांना सीसीबी पोलिसांनी बुधवारी अटक केली. बेंगळूर हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी तपास गतिमान केला आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोनशेहून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीबी पोलिसांना समजले की त्याने सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) चे नेते मुझमिल पाशा आणि इतरांना ११ फोन कॉल केले होते. तपासासाठी त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, बेंगळूरचे पोलीस आयुक्त कमल पंत यांनी डीजे हळ्ळी आणि केजी हळ्ळी पोलीस ण्यांना भेट देऊन अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.