वार्ताहर / परळी
साताऱयातला बोगदा हा ब्रिटिशकालिन आहे. या बोगद्याचे आयुर्मान जरी जास्त झाले असले तरीही या बोगद्यातूनही अजूनही वाहतूक सुस्थितीत होते. यावर्षी बांधकाम विभागाने पावसाळय़ात झालेल्या पडझडीच्या घटनेमुळे दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्याकरता बोगद्यातून ही वाहतूक एकेरी करण्यात आली आहे. तर अन्य मार्गाने म्हणजेच खिंडवाडी मार्गे पर्यायी मार्ग वळवला गेला आहे. सध्या काम सुरु असल्याने वाहतूकीचा बटय़ाबोळ सुरु असून दररोजचाच त्रास परळी भागातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच अगोदरच संवेदनशील असणाऱया बोगद्यात आता नित्याचेच वादावादीचे प्रकार घडू लागले आहेत.
ब्रिटीशकालिन असलेल्या बोगद्याच्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. शेंद्रे ते सातारा या बाह्यवळण रस्त्यावर राज्य मार्ग 140 मध्ये अस्तित्वात असलेल्या बोगद्याच्या दुरुस्तीचे काम बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. त्याकरता एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. यामुळे ये-जा करणाऱया वाहनधारकांना तासंतास बोगद्यातून साताऱयात येण्यासाठी ताटकळत प्रवास करावा लागत आहे. परळी भागातून शहरत दाखल होण्यासाठी वाहन धारकांना तासंतास वाट बघावी लागत आहे. सकाळच्या प्रहरात बोगदा ते समर्थ मंदीर अन् बोगदा ते जवळपास डबेवाडी येवढय़ा लांब दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहे. यामुळे यामार्गाहून प्रवास करताना वाहनधारकांची दमछाक होत आहे.