ऑनलाईन टीम / लंडन :
देशातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी सोमवारी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली. हा लॉकडाऊन फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत सुरू राहू शकतो.
जॉन्सन म्हणाले, ब्रिटनमधील 60 टक्के नागरिककोरोनाच्या नव्या विषाणूच्या संपर्कात आले आहेत. नवीन विषाणुमुळे मृत्यूचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून देशात पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. 5.6 कोटी लोक लॉकडाऊनमध्ये येणार आहेत.
बुधवारपासून देशातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठ बंद राहतील. केवळ ऑनलाईन वर्ग घेतले जातील, असेही त्यांनी सांगितले.