वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
यामाहा कंपनीने भारतीय बाजारामध्ये 2021 माय एफझेड एफआय आणि एफझेडएस एफआय दुचाकी सादर केली आहे. सदरचे मॉडेल हे फेसलिफ्ट मॉडेल असल्याचे कंपनीने सांगितले आहे. 2021 एफझेड एफआय या मॉडेलची सुरुवातीची किमत 1.03 लाख रुपये आहे. तर दुसऱया बाजुला एफझेडएस एफआय याची प्रारंभीची किमत ही 1.07 लाख रुपये असल्याची माहिती आहे. सदर मॉडेलच्या तुलनेमध्ये क्रमशः 1000 आणि 2500 रुपये इतकी किमत अधिक असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. (सर्व किमती एक्स-शोरुम)
माय अपडेटच्या व्यतिरिक्त कंपनीने यामध्ये नवीन कलर योजना जोडली आहे. 2021 एफझेड एफआय रेसिंग ब्लू आणि मेटॅलिक तर नवीन एफझेडएस एफआय नवीन मॅट रेड, डार्क मॅट ब्लू, डार्क नाइट आणि विंटेज ऍडिशनल कलरचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
ब्लूटय़ूथ टेक्नॉलॉजीची सोय
सर्वात मोठी अपडेट म्हणजे कंपनीने यामध्ये ब्लूटय़ूथ टेक्नॉलॉजीसोबत जोडले आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने दुचाकीला एका ऍपसोबत जोडण्यात येणार आहे. ज्यामध्ये दुचाकीसंबंधीत राइडर कॉल बॅक, लोकेशन, हजार्ड आणि ई-लॉकची सुविधा प्राप्त होणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.