ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतीय हवाई दलात एप्रिल 2021 पर्यंत आणखी 16 राफेल फायटर विमाने दाखल होणार आहेत. भारताने फ्रान्सला 36 राफेल विमानांची ऑर्डर दिली आहे. त्यामधील 5 राफेल विमाने फ्रान्सने यापूर्वीच भारताला दिली आहेत.
जानेवारी महिन्यात 3 राफेल विमाने भारतात पोहोचणार आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात 3 आणि एप्रिल महिन्यात 7 राफेल विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील होतील, असे फ्रान्सची जेट इंजिन तयार करणारी कंपनी सफरानकडून सांगण्यात आले.
दरम्यान, यापूर्वी 29 जुलै रोजी राफेल विमानांची पहिली तुकडी हरियाणातील अंबाला एअरबेसवर दाखल झाली. 10 सप्टेंबरला एका औपचारिक कार्यक्रमाद्वारे या विमानांचा हवाई दलात समावेश करण्यात आला. राफेल विमानांची दुसरी तुकडी पश्चिम बंगालमधील हवाई दलाच्या कलईकुंडा तळावर तैनात केली जाणार असल्याचे समजते.