पालये / वार्ताहर
चोपडे येथील डॉ.भिमराव आंबेडकर स्पोर्टस क्लबतर्फे येथील जमीनदार व पेडणेचे माजी आमदार स्व.जितेंद्र देशप्रभू यांच्या प्रथम वर्ष स्मृतिदिनाप्रीत्यर्थ त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
स्व.जितेंद्र देशप्रभू यांचे दि. 21 एप्रिल रोजी प्रथम वर्ष पुण्यस्मरण झाले.या निमित्त आंबेडकर स्पोर्ट्स क्लबतर्फे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी क्लबचे अध्यक्ष लाडू चोपडेकर,आगरवाडा – चोपडे पंचायतीचे पंच सदस्य नितीन चोपडेकर,देवस्थानचे माजी अध्यक्ष शाबा चोपडेकर,क्लबचे माजी अध्यक्ष सूर्या चोपडेकर,रावजी चोपडेकर,नरेश चोपडेकर,एकनाथ चोपडेकर व अन्य क्लबचे पदाधीकारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय नौसेनेचे सेवानिवृत्त कर्मचारी दिगंबर चोपडेकर यांनी स्व.जितेंद्र देशप्रभू यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.याप्रसंगी क्लबचे अध्यक्ष लाडू चोपडेकर यांनी विविध क्षेत्रांत आपल्या नावांचा दबदबा निर्माण करणारे व उत्कृष्ट संसदपटू स्व.देशप्रभू हे आमच्यासाठी आमचे आधारस्तंभ व दैवत होते.सदैव आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे ते आमच्यासाठी आदर्श व प्रेरणादायी नेते आहेत अशा शब्दांनी श्री.चोपडेकर यांनी त्यांना श्रद्धा?जली वाहिली.कोविडचे मार्गदर्शक नियम व तत्वाचे पालन करून क्लबतर्फे श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.