आरोग्य कर्मचाऱयांचे समर्थन करण्यासाठी दौरा
वृत्तसंस्था/ जयपूर
भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांना राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. जयपूर येथे दीर्घकाळापासून आरोग्य सहाय्यकांचे सुरू असलेल्या आंदोलनात सामील होण्यासाठी ते पोहोचले होते. उदयपूर येथील घटनेनंतर जयपूरसह पूर्ण राज्यात सध्या कलम 144 लागू आहे. कलम 144 चे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद करत पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.
आरोग्य सहाय्यकांच्या आंदोलनात सामील होण्यासाठी आलेले चंद्रशेगार हे जयपूर येथील एका हॉटेलात वास्तव्यास होते. तेथेच त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. राजस्थान सरकारने कोरोना काळात आरोग्य सहाय्यकांची भरती केली होती. या कर्मचाऱयांची संख्या सुमारे 28 हजार इतकी आहे. राज्य सरकारने 31 मार्च रोजी या सहाय्यकांची सेवा समाप्त केली होती. या कर्मचाऱयांनी पुन्हा सेवेत घ्यावे म्हणून आंदोलन चालविले आहे.