प्रतिनिधी /बेळगाव
मजगाव येथील जागृत देवस्थान श्री ब्रह्मलिंग मंदिरात यंदाही दसरोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात येत असून कोरोनाच्या संसर्गामुळे प्रशासनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. घटस्थापनेपासून मंदिरात रोज पाने, फुले, फळे यांची आकर्षक आरास करून रात्री 9.30 वा. गाऱहाणे कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यानिमित्त सर्व मंदिरांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे व भजनांचे आयोजन केले आहे.
कार्यक्रमांना गावातील व पिरनवाडी, ब्रह्मनगर, गजानन नगर, देवेंद्र नगर, कलमेश्वर नगर, संत ज्ञानेश्वर नगर, राजाराम नगर, उद्यमबाग आदी उपनगरांतील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. यावेळी मंदिरात गाऱहाणे घतल्यानंतर प्रसादाचे वाटप होते. बुधवार दि. 13 रोजी अष्टमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यावेळी विधिवत आरास करून पुजारी रात्री 11.30 वा. डोकीवर आरतीचे ताट ठेवून मंदिराला पाच फेऱया मारतात. अष्टमीचा सदर कार्यक्रम पाहण्यासाठी गोवा, महाराष्ट्र आदी भागातील भक्तगण येतात. गुरुवारी 14 रोजी खंडेनवमीनिमित्तही मंदिरामध्ये विशेष पूजा व शस्त्रपूजन होते. शुक्रवारी 15 रोजी सीमोल्लंघनाचा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात होत असतो. श्री ब्रह्मदेव मंदिरात दुपारपासूनच सर्व तयारी सुरू असते. दुपारी 4 वा. श्री ब्रह्मदेवाची पालखी स्नानासाठी पाटील वाडय़ावर जाऊन वाजत गाजत येते. त्यानंतर पालखी सजावटीचे काम मानकऱयांकडून होते. गाऱहाणे घातल्यानंतर मंदिराच्या परिसरात नारळ उडविण्याचा कार्यक्रम असतो. शेकडो भाविक यामध्ये सहभागी होतात.
श्री ब्रह्मदेवाची पालखी गावच्या सीमेवरून ब्रह्मनगर येथील श्री बन्नी भरमाप्पा देवस्थानजवळ येऊन सायंकाळी 7 वा. सीमोल्लंघनाचा कार्यक्रम पार पडतो. यावेळी मजगाव, पिरनवाडी, उद्यमबाग व उपनगरातील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. यावषीही सीमोल्लंघनाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने मानकरी आणि पुजारी यांच्या उपस्थितीत पार पाडण्याचे आवाहन देवस्थान कमिटीने केले आहे.