वेंगुर्ले/ वार्ताहर-
सांगली येथे झालेल्या फेस्टिवल, रिसोर्सेस कार्यक्रमात मदर तेरेसा स्कूलची निरजा भालचंद्र माडकर नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापक फादर डिसोझा यांनी निरजाचा सत्कार केला.
सांगली येथील स्पर्धेसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून 200 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. या आधी निरजा माडकर हिने विविध राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. सांगली येथे प्रथम क्रमांक मिळाल्यामुळे प्रशालेच्यावतीने मुख्याध्यापक फादर डिसोझा यांनी निरजाचा सत्कार केला. तसेच प्रशालेचे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.