ऑनलाईन टीम / भोपाळ :
मध्यप्रदेशच्या सिधी येथील बस दुर्घटनेत 39 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, 8 जण अद्याप बेपत्ता आहेत. तर 7 जण बचावले आहेत.
सिधीहून सतनाच्या दिशेने निघालेली प्रवासी बस सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास 30 फूट खोल कालव्यात कोसळली. या बसमधून 54 प्रवाशी प्रवास करत होते. बस 20 ते 22 फूट पाण्यात पूर्णपणे बुडाली होती. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. मात्र, 7 प्रवाशी कसेबसे पाण्याबाहेर आले. क्रेनच्या सहाय्याने बस पाण्यातून बाहेर काढण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.