ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या हाती आलेल्या कलांनुसार राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेस प्रणित महाआघाडी 126 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप-जदयू (एनडीए) 109 जागांवर पुढे आहे.
जेडीयू 49, भाजप 55, राजद 91, काँग्रेस 25, लोजपा 04 तर इतर पक्षांनी 18 जागांवर आघाडी घेतली आहे. महाआघाडी व एनडीए यांच्यात अटीतटीची लढत होताना दिसत आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीचा आकडा आता काहीसा कमी होताना दिसत असून, एनडीचा आकडा वाढू लागला आहे.
महाआघाडीचे नेतृत्व करणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून आघाडीवर आहेत. बिहारच्या 3 कोटींहून अधिक मतदारांसह 3734 उमेदवारांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. दुपारपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल.