बेळगाव : शिवाजीनगर येथील शाळा क्र. 27 येथील 1980 च्या बॅचच्या माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने शिक्षिका लक्ष्मीबाई शहापूरकर यांची भेट घेऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. 41 वर्षांनंतर शिक्षिकेची भेट झाल्यामुळे गप्पाटप्पांचा कार्यक्रम पार पडला. सध्या त्या 81 वर्षांच्या असून शाळेतील कडक शिस्तीच्या शिक्षिका म्हणून त्यांची ओळख असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितले. माजी विद्यार्थ्यांच्यावतीने त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. यावेळी महेश पावले, जोतिबा रेडेकर, अशोक कालकुंद्रीकर, हरिबा पाटील, प्रदीप नेसरीकर, तानाजी चंदगडकर, सुधाकर सुतार, गजानन खराडे, श्रीकांत हन्नूरकर उपस्थित होते.
Previous Articleशिवबसवनगर जोतिबा मंदिरात प्रकटदिन
Next Article जगाला व्यापून असलेला ‘ब्रह्म’ माझ्यासाठी गुरुस्थानी!
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.