क्रूरतेसमोर करुणेचे चित्र
समोर शस्त्र हातात घेतलेले सैन्य उभे होते. मागे देशाच्या लोकशाहीवरील हल्ल्याला विरोध करणारे निदर्शक. या दोघांदरम्यान उभ्या होत्या सिस्टर ऐन रोजा आणि आपल्याला काय करावे लागेल याची त्यांना जाणीव होती. पांढरा रोब आणि काळय़ा हॅबिटमध्ये हात पसरविलेल्या सिस्टर रोझ रस्त्याच्या मधोमध बसल्या अणि गोळीबार न करण्याचे आवाहन करू लागल्या. म्यानमारमध्ये सत्तापालट झाल्यावर सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांदरम्यान अनेक जण मारले गेले आहेत. सोमवारीही दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. अशा स्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव वाचविणे हा सिस्टर रोजा यांचा उद्देश होता.
तुम्हाला गोळीबार करायचा असेल तर सर्वप्रथम मला ओलांडावे लागेल असे सिस्टर रोजा यांनी सैन्यअधिकाऱयांना सांगितले होते. सिस्टर रोजा यांच्यासमोर हात जोडून सैनिकांनी निदर्शन थांबविण्यासाठी कारवाई करावीच लागणार असल्याचे म्हटले होते. सैन्यदलाने अश्रूधूराचा वापर केल्यावर सिस्टर रोजा यांची प्रकृती बिघडू लागली होती.