बेळगाव : ऑगस्ट 2019 मध्ये राज्यात अनेक ठिकाणी महापुराने थैमान घालून गरीब नागरिकांची घरे जमीनदोस्त केली होती. त्यावेळी माविनकट्टी गावातील काही घरेसुद्धा नुकसानग्रस्त झाली होती. या घरांची बांधणी किंवा दुरुस्ती करण्यासाठी पंधरा लाभार्थींना आदेशपत्रे मिळवून देण्यासाठी बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पाठपुरावा करून त्यांना मदत केली आहे. तब्बल दोन वर्षापर्यंत या पूरग्रस्त लाभार्थींच्या समस्यांचे निवारण झाले नव्हते. मात्र, आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सततच्या प्रयत्नाने लाभार्थींची समस्या सुटल्यामुळे समाधान व्यक्त करण्यात आले. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या अनुपस्थितीत या आदेशपत्रांचे वितरण लक्ष्मीताई को-ऑप. सोसायटीचे चेअरमन चन्नराज हट्टीहोळी यांनी केले. आदेशपत्रे वितरण समारंभात ज्ये÷ नागरिक सिदाय गडाद, उळवाप्पा मल्लण्णावर, चन्नाप्पा हिरेहोळी आणि लाभार्थी उपस्थित होते. सर्व लाभार्थ्यांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
Previous Articleमुटकोर्ट स्पर्धेत पुण्याचे सिम्बॉयसिस लॉ स्कूल विजयी
Next Article इंधनाच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.