प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा सरकार गोव्यातील पर्यटनाला स्वयंपूर्ण करण्यासाठी गोव्यातील पर्यटनासाठी सर्वोत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधांचा विकास करीत असल्याचे सांगितले.
पर्यटन खाते आणि गोवा पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सांता मोनिका जेट्टी पणजी येथे अद्ययावत जेट्टी टर्मिनल इमारत आणि पर्यटन सुविधांच्या पायाभरणी समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना या प्रकल्पांमुळे पर्यटन पायाभूत सुविधा मजबूत होतील आणि गोव्यातील पर्यटनात वाढ होईल असे त्यांनी सांगितले. या प्रकल्पाचे काम ईजी माईल आणि शांता इन्फ्राटेक प्रा. लिमिटेडद्वारे केले जात आहे. पार्किंग स्ल?टसाठी इझी माईल आणि जेट्टीच्या विकासासाठी शांता इन्फ्राटेक प्रा. लिमिटेड काम करणार आहे. येत्या 2 वर्षात हा प्रकल्प जागतिक दर्जाच्या प्रकल्पांपैकी एक होईल असे सांगून त्यांनी गोव्यात येणाऱया पर्यटकांना या प्रकल्पाचा निश्चितच लाभ मिळेल असे सांगितले.
यातून पर्यटन खात्याला प्रतिवर्ष 1.30 कोटींचा महसूल मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आणि मेसर्स शांता इन्फ्राटेक देखभाल, वीज, विमा, दिवाबत्ती, डव्ल्युसी, पाणी इत्यादी सर्व शुल्काचा भार उचलेल. या महसुलात दर तीन वर्षांनी 15 ज्ञ् वाढ होईल.
टर्मिनल इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 2130 चौरस मीटर आणि बिल्ड क्षेत्र 5500 चौरस मीटर असेल. त्यापैकी प्रुझ टर्मिनलसाठी 2150 चौरस मीटर भविष्यातील विस्तारासाठी आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन देण्यात आली आहे आणि उर्वरित 3350 चौरस मीटर क्षेत्र पर्यटन, व्यावसायिक आउटलेट्स, पर्यटक सुविधा, मनोरंजन, जाहिराती, खाद्यपदार्थ आणि पेये यासारख्या व्यावसायिक हेतूंसाठी दिली आहे. क्रूझ टर्मिनलमध्ये विमानतळाप्रमाणेच सर्व सुविधा असतील त्यात सुमारे 400 पर्यटकांसाठी प्रतीक्षा क्षेत्र, शौचालये आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा, अपंगांसाठी अनुकूल परिसर, अन्न आणि व्यापारी किऑस्क, स्विफ्ट तिकीट आणि सुरक्षा चौक्मया, सार्वजनिक घोषणा सुविधा यांचा समावेश आहे.
यावेळी पणजीचे महापौर श्री रोहित मोन्सेरात्त, जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री निखिल देसाई, नारायण मयेकर व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नार्वेकर यांनी केले.