ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून कोरोना लसीकरण मोहीम तीव्र करण्यावर भर दिला जात आहे. लवकरच देशात ‘मॉडर्ना’ची लसही आयात केली जाऊ शकते. भारतीय औषध नियंत्रक (डीसीजीआय) लवकरच ‘सिप्ला’ या फार्मा कंपनीला मॉडर्नाची लस आयात करण्यास मान्यता देऊ शकते. सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
अमेरिकेतील ‘मॉडर्ना’ लस निर्मात्या कंपनीने भारतात लसीकरणासाठी डीसीजीआयकडे परवानगी मागितली आहे. तसेच सिप्लाने या लसीच्या आयात आणि विपणन संदर्भातील अधिकारांसाठी अर्ज केला आहे. 18 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी ‘मॉडर्ना’ लसीचा तातडीचा वापर करण्यात भारतीय औषध नियंत्रक मान्यता देऊ शकतात, असे सूत्रांचे म्हणणे आहे.