वार्ताहर / राशिवडे
मोहडे ( ता. राधानगरी ) येथील ज्ञानदेव गणपती आदिगरे यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागून मोठे नुकसान झाले आहे. आगीतुन जनावरे सुखरूप बाहेर काढली मात्र ती काढत असताना मालक किरकोळ जखमी झाले आहेत.
मोहडे येथील ज्ञानदेव गणपती आदिगरे यांचा मोहडे ते वाघवडेकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोठा बांधलेला आहे. त्याच्या माळ्यावर गवत आणि पिंजर भरले होते. खाली गाई-म्हशी बांधल्या होत्या सायंकाळी पाचच्या सुमारास या गोठ्याला आग लागली. यामध्ये सर्व इमारत जळून खाक झाली’ वैरणही जळून गेली.
आग लागलेली कळताच श्री. आदिगरे यांनी सर्वप्रथम जनावरे बाहेर काढली. या गडबडीत त्यांच्या डोक्यावर विस्तव पडून ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर लगेच उपचार करण्यात आले. आग विझवण्यासाठी भोगावती आणि बिद्री साखर कारखान्याचे अग्निशामक दल पाचारण करण्यात आले होते. त्यानंतर आग आटोक्यात आली मात्र पूर्ण गोठा खाक झाल्याने आदिगरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.