प्रतिनिधी / बेळगाव
सर्वांना कळविण्यात येत आहे की, समितीच्यावतीने सुरू करण्यात येणारे केंद्र हे कोरोना विलगीकरण असून हे हॉस्पिटल नाही. त्यामुळे येथे ऑक्सिजन बेड उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे ज्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी 90 च्या खाली जात आहे त्यांनी आपल्या रुग्णांना मराठा मंदिर येथे न आणता इतर हॉस्पिटलमध्ये भरती करावे.
मराठा मंदिर येथील विलगीकरण केंद्रात कोण उपचार घेऊ शकतात?
- ज्यांचे घर लहान आहे किंवा एकत्र कुटुंब आहे आणि घरात एकटे-दोघे कोरोना बाधित असतील आणि घरातील इतर मंडळींना त्याची लागण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज आहे त्या लोकांसाठी हे केंद्र उपयोगी आहे.
- या केंद्रात भरती होताना, कोविड पॉझिटिव्ह अहवाल सक्तीचा आहे.
- रुग्णाचे वय 70 च्या आता असले पाहिजे.
- ऑक्सिजन पातळी 90 च्या वर असली पाहिजे.
- सिटीस्कॅन HRCT स्कोर 8 च्या आत राहिला पाहिजे.
- त्याचप्रमाणे जे लक्षणविरहित कोरोना रुग्ण आहेत, ज्यांना विलगीकरण (क्वारंटाईन) होण्यास सांगितले आहे ते या केंद्रात भरती होऊ शकतात.
केंद्रातील सोईसुविधा
- केंद्रात रुग्णांच्या देखभालीसाठी आणि उपचार देण्यासाठी 24 तास डॉक्टर, नर्स यांचे वैद्यकीय पथक उपस्थित राहणार आहे.
- गरजू रुग्णांसाठी औषधे उपलब्ध असतील
- रुग्णांच्या जेवणाची व्यवस्था केंद्रामध्ये केली जाणार आहे.आपत्कालीन परिस्थितीमध्ये राखीव ऑक्सिजन आणि रुग्णवाहिकेची सोय राहणार आहे.