प्रतिनिधी / रत्नागिरी:
गरीब व गरजू व्यक्तींना केवळ 10 रूपये दरात शिवभोजन उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचे पालकमंत्री अनिल परब यांच्याहस्ते 26 जानेवारी उद्घाटन होणार आहे. रत्नागिरीमध्ये या योजनेत 3 केंद्रे सुरू होत असून प्रत्येक ठिकाणी 100 थाळय़ा उपलब्ध असतील. या भोजनाचा लाभ घेणाऱया व्यक्तीचा फोटो घेतला जाणार असून नाव सांगणेही बंधनकारक आह़े सेवा पुरवठा दाराने कागदपत्राची नोंद न ठेवता केवळ ऍपवर नोंदी ठेवण्याची सुविधा देण्यात आली आह़े
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे की, योगिता भाटकर लोकसंचलित साधन केंद्र, रत्नागिरी यांचे रेल्वेस्टेशन येथे एक केंद्र सुरू करण्यात येईल़ दुसरे केंद्र रत्नागिरी एसटी बसस्थानक शेजारी हॉटेल मंगला येथे सुरू होणार आह़े तिसरे केंद्र चालवण्याचे अधिकार जिल्हा शासकीय रुग्णालय येथे काम करणाऱया डी.एम.एंटरप्रायजेस वाशी यांच्याकडे देण्यात आले आहेत़ यातील मंगला हॉटेलचे व्यवस्थापन राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी नगर परिषद गटनेते सुदेश मयेकर यांच्याकडे आह़े प्रत्येक भोजनालायाच्या ठिकाणी 100 थाळ्यांची मान्यता देण्यात आली आहे.
या योजनेखाली भोजनालय हे दुपारी 12 ते 2.00 या वेळेत कार्यरत राहील. भोजनालयात बाहेरचे जेवण घेवून येण्यास तसेच भोजनालयातील जेवण बाहेर घेवून जाण्यास मनाई असेल. शासकीय कर्मचाऱयांना तसेच ज्या ठिकाणी ही योजना राबवण्यात येईल तेथील आस्थापनेवरील कर्मचाऱयांना भोजनालयात सवलतीच्या दरात जेवणास सक्त मनाई असेल. भोजनालय चालकांनी दुपारी 12 ते 2 या वेळेत स्वतंत्र व स्वच्छ जागा यासाठी उपलब्ध करुन द्यावयाची आहे. एकाच लाभार्थ्याकडून एकापेक्षा जास्त वेळा थाळी घेतली जावू नये याची दक्षता घेण्यात यावी. पिण्यासाठी स्वच्छ पाणी व हात धुण्यासाठी वॉश बेसीन तसेच साबण व निर्जंतुक करण्यासाठी द्रावणे ठेवण्यात यावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केल्या आहेत़
प्रत्येक लाभार्थ्याला शिवभोजन थाळी दिल्यानंतर त्याचा फोटो काढण्यात येणार आह़े दिवसभरात काढण्यात आलेले फोटो यासाठी तयार करण्यात करण्यात आलेल्या ऍपवर अपलोड करण्याच्या सूचना सेवा पुरवठादाराला देण्यात आल्या आहेत़ लाभार्थ्याला थाळी घेताना आपले नाव सांगणे बंधनकारक करण्यात आले आह़े ज्या ठिकाणी गर्दी होईल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त पुरवण्यात येईल.
जिल्हा शासकीय रूग्णालयातील शिवभोजन केंद्र उद्घाटन पालकमंत्री अनिल परब यांच्याहस्ते 26 जानेवारी रोजी होणार आह़े त्याचदिवशी हॉटेल मंगला व रेल्वेस्टेशन येथील पेंद्रांचे उद्घाटन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्याहस्ते होणार आह़े