वेंगुर्ले / वार्ताहर –
राज्यस्तरीय ऑनलाइन अभंग गायन स्पर्धा २०२१ मध्ये वेंगुर्ले तालुक्यातील अणसुर सुपुत्र तेजस मेस्त्री यांने सादर केलेल्या अभंगाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. पुणे भारत गायन समाज संचलित वागेश्वरी संगीत विद्यालय व साईकेदार बोधनकर युट्युब चॅनल तर्फे भव्य राज्यस्तरीय ऑनलाइन अभंग गायन स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली होती. या गटामध्ये सिंधुदुर्ग मधील अणसुर या गावचा सुपुत्र तेजस मेस्त्री याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच साटेली येथील सत्यनारायण कळंगुटकर याचा द्वितीय क्रमांक आला आहे.