मुख्यमंत्र्यांचे उद्गार
मळा पणजी येथे कनव्हेंशन सेंटरची पायाभरणी
प्रतिनिधी/ पणजी
पणजी मळा येथे उभारण्यात येणारा मिनी कनव्हेंशन सेंटर हा पर्यटकांचे आकर्षण ठरणार असून यामुळे अनेक पर्यटक गोव्यात येणार आहेत. गोवा हे पर्यटकांचे आकर्षण असून पुढील काळात गोव्यातील पर्यटन क्षेत्र आणखी वाढविले जाणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजी मळा येथे नवीन बांधण्यात येणाऱया मिनी कनव्हेंशन सेंटरच्या पायाभरणीवेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पर्यटन खात्याचा हा एक मोठा प्रकल्प असून सुमारे 90 कोटी रुपये खर्च करुन हा प्रकल्प उभा केला जाणर आहे. दिड वर्षात हा परिषद सभागृह पूर्ण केला जाणार आहे. या सभागृहाची 1300 प्रेक्षक बसण्याची क्षमता असणार आहे. कलाअकादमीपेक्षा हा सभागृह मोठा असणार आहे. त्यामुळे पर्यटनासंबधी मोठ मोठे कार्यक्रम या सभागृहात होणार आहे. सध्या पणजी कलाअकादमी हा एकच मोठा सभागृह आहे. पण या ठिकाणी वर्षाचे सर्व दिवस कार्यक्रम होत असतात. त्यामुळे शहरात मोठे सभागृह नाही. हा एकमेव असा मोठा सभागृह असणार असून यात देश विदेशातील पर्यटकांचे चर्चा सत्र तसेच अन्य कायक्रम होणार आहे. त्यामुळे हा सभागृह पर्यटन क्षेत्रात भर घालणार आहे, असे यावेळी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पर्यटन खात्याचे अनेक प्रकल्प पूर्णत्वाकडे
सध्या अनेक प्रकल्प पूर्णत्वाचा मार्गावर आहे. तर काही जणांची पायाभरणी झाली आहे. पण सध्या कोरोनामुळे त्यांचे उद्घाटन करण्यात आले नाही. टप्याटप्याने त्यांचे sउद्घाटन केले जाणार आहे. पर्यटन खात्याचे अनेक प्रकल्प आहे. पर्यटन खात्याने आतापर्यंत अनेक प्रकल्प पूर्ण केले आहे. आणखी प्रकल्प होणार आहे. हा सभागृह फक्त पर्यटन खाते व पर्यटन महामंडळ अंतर्गत चालणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
पर्यटन क्षेत्रात भर घालणारः पर्यटन मंत्री
हा सभागृह राज्याच्या पर्यटन क्षेत्रात भर घालणारा आहे. यामुळे राज्यात अनेक पर्यटनाशी निघडीत कार्यक्रम होणार आहे. पणजी शहरातील हा एकमेव असा प्रकल्प होणार असून यात अनेक चर्चा सत्रे होणार आहे. गोवा पर्यटन खात्यातर्फे अनेक प्रकल्प होत असून भविष्यात गोव्यात पर्यटन क्षेत्र मोटय़ा प्रमाणात वाढविले जाणार आह sअसे पर्यटनमंत्री बाबू आजगांवकर यांनी सांगितले.
पर्यटकांचे आकर्षण ठरणार : महापौर
पणजी शहराला आणखी एका सभागृहाची गरज होती पणजी शहरात एकच कलाअकादमी असल्याने या ठिकाणी कार्यक्रम करायला मिळत नाही. आता हा साभागृह झाल्यावर या ठिकाणी पर्यटन निघडीत असे कार्यक्रम होणार आहे. मळा येथे उभारण्यात येणाऱया या ठिकाणावरुन पणजी शहराचा सुंदर नजरा दिसतो. त्यामुळे हे पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे, असे महापौर उदय मडकईकर यांनी सांगितले.
या सभागृहाच्या पायाभरणीवेळी पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार दयानंद सोपटे, पर्यटन विकास महामंडळाचे संचालक मंडळ पर्यटन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.