बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून बुधवारी 16,387 नवे रुग्ण आढळून आले. दिवसभरात केलेल्या चाचण्यांच्या तुलनेत पॉझिटिव्हीटीचे प्रमाण 11.22 टक्के इतके होते. दरम्यान, मागील चोवीस तासांत 21,199 जणांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात 463 रुग्णांचा बळी गेला आहे.
चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात बुधवारी दिवसभरात 1,45,923 कोविड चाचण्या करण्यात आल्या. राज्यात आतापर्यंत 26,35,122 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकूण 23,12,060 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 30,017 जण कोरोनाने दगावले आहेत. सध्या सक्रिय रुग्णसंख्या 2,93,024 इतकी आहे.