रविवार दि. 17 ते 23 जानेवारी 2021
मेष
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, मंगळ, हर्षल युती होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला वादविवाद होईल. प्रवासात सावध रहा. धंद्यात जम बसेल. मागील थकबाकी वसूल करा. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. नवीन परिचय होईल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कर्तृत्वाचा ठसा उमटेल. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात प्रगती कराल. शेतकरी वर्गाला संयम ठेवावा लागेल, यश मिळेल.
वृषभ
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, मंगळ, हर्षल युती होत आहे. भावनेच्या आहारी न जाता व्यवहार करा. मनावर दडपण येईल. खर्च वाढेल. प्रवासात सावध रहा. कायदा पाळा. धंद्यात काम मिळेल. भागिदार कठोर धोरण ठेवेल. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. राजकीय, सामाजिक कार्यातील समस्या कमी करण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. रागावर ताबा ठेवा. शिक्षणात जिद्द ठेवा.
मिथुन
या सप्ताहात चंद्र, नेपच्यून युती, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात तडजोड करावी लागेल. दिलेला शब्द पाळणे कठीण होईल. कायदा पाळा. प्रवासात नवीन ओळखी होतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला कमीपणा देण्याचा प्रयत्न होईल. तुमचा डाव तुमच्यावर उलटण्याची शक्मयता आहे. संसारात वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. आधार कमी होईल. नम्रता ठेवा. शिक्षणात मेहनत घ्या.
कर्क
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात चांगला जम बसेल. वसूली मिळणे कठीण आहे. नोकरीत प्रभाव वाढेल. संसारात क्षुल्लक नाराजी होईल. पोटाची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यातील समस्या कमी होईल. योजनांना गतिमान कराल. नवीन ओळख फसवी असू शकते. क्रीडा, साहित्य, शिक्षणात प्रगती होईल. मैत्रीत तणाव होईल.
सिंह
या सप्ताहात मंगळ, हर्षल युती, शुक्र, नेपच्यून लाभयोग होत आहे. तणावाचे प्रसंग वारंवार येतील. प्रकृतीची काळजी घ्या. विरोधकांना सामोपचाराने राजकीय, सामाजिक कार्यात उत्तरे द्या. तुमचा पाणउतारा करण्याची संधी विरोधक घेतील. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. घरातील वृद्ध व्यक्तीची काळजी घ्यावी लागेल. कला क्षेत्रात ओळखी होतील. प्रसिद्धीसाठी सर्वच क्षेत्रात वाट पहावी. ओळखी होतील. प्रसिद्धीसाठी सर्वच क्षेत्रात वाट पहावी लागेल.
कन्या
या सप्ताहात चंद्र, गुरु लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. कठीण प्रसंग निर्माण होईल. हुशारीने त्यावर मात करावी लागेल. कदाचित ऑपरेशनची वेळ येऊ शकते. वाद वाढवू नका. नोकरीत कामाचा क्याप सहन करावा लागेल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाचे काम तुमच्याकडे दिले जाईल. धंद्यात काम मिळेल. जवळचे लोक अडवणूक करतील. शिक्षणात मेहनत घ्या. रागावर ताबा ठेवा.
तुळ
या सप्ताहात मंगळ, हर्षल, युती, शुक्र, नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात संयम ठेवा. काम मिळवा. नोकरवर्गाला जपावे लागेल. नोकरीत तुमचे चांगले काम पाहून काही व्यक्ती अडचणी निर्माण करतील. कायदा पाळूनच मत कुठेही व्यक्त करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमच्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच, असे समजू नका. संसारात कामे वाढतील. कला, क्रीडा, शिक्षणात मेहनत घ्या. राग आवरा.
वृश्चिक
या सप्ताहात सूर्य, चंद्र लाभयोग, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. तुम्हाला धंद्यात मोठे कंत्राट मिळेल. प्रयत्न करा. वसुली करा. पैसा योग्य ठिकाणी गुंतवा. शेअर्समध्ये लाभ मिळेल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. संसारात प्रगतिकारक घटना घडेल. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढवता येईल. विरोधक हट्ट करतील. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात चमकाल.
धनु
या सप्ताहात चंद्र, बुध लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. संततीबरोबर वाद होईल. पोटाची काळजी घ्या. धंद्यात जम बसेल. फायदा वाढेल. मोठे काम घ्या. नोकरीत वरि÷ांची मर्जी राखता येईल. शेतकरी वर्गाला नवा मार्ग यश देईल. कर्ज मिळेल. राजकीय, सामाजिक कार्याला गती मिळेल. लोकप्रियता वाढेल, असे कार्य करा. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात पुढे जाल.
मकर
या सप्ताहात मंगळ, हर्षल युती, मंगळ, गुरु केंद्रयोग होत आहे. धंद्यात काम मिळेल. गोड बोलून गिऱहाईक व भागिदार यांच्याशी व्यवहार करा. जवळच्या व्यक्तीची नाराजी होईल. नोकरीत तुमचा प्रभाव पडेल. राजकीय, सामाजिक कार्यात सहकारी, नेते कदाचित तुमच्यावर नाराज होतील. चर्चा करताना वाद विकोपाला जाईल. प्रवासात काळजी घ्या. खाण्याचे तंत्र सांभाळा. क्रीडा, साहित्य, शिक्षणात प्रगती कराल. एखादा विरह त्रासदायक वाटेल.
कुंभ
या सप्ताहात मंगळ, हर्षल युती, शुक्र, नेपच्यून लाभयोग होत आहे. धंद्यात सावधपणे चर्चा करा. शब्द जपून वापरा. नोकरवर्ग दगा देईल. नोकरीत वाद वाढेल. अहंकार ठेवू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तटस्थ धोरण ठेवा. लोकांच्या वागण्याचा अभ्यास करा. कायद्याला धरूनच मुद्दे मांडा. संसारात जबाबदारी वाढेल. प्रकृतीची काळजी घ्या. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात सहनशीलता ठेवा. मेहनत घ्या. निराश होऊ नका.
मीन
या सप्ताहात चंद्र, गुरु लाभयोग, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. फायदा वाढेल. जुने येणे वसूल करा. नोकरीत तुमचे काम चोख असेल. बढती होईल. बेकारांनी नोकरी शोधावी. राजकीय, सामाजिक कार्याला गति देता येईल. योजना पूर्ण करा. लोकांना दिलेला शब्द पाळा. पद मिळेल. कला, क्रीडा, साहित्य, शिक्षणात प्रगती होईल. रेंगाळलेली कामे करून घ्या. आळस करू नका.