नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तीन लस उत्पादक कंपन्यांनी ‘डीसीजीआय’कडे लसीच्या आपत्कालीन वापरासाठी अर्ज केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, यापैकी सीरम इन्स्टिटय़ूटच्या कोव्हिशिल्ड कोरोना प्रतिबंधक लसीला भारतामध्ये पहिली परवानगी मिळू शकते अशी दाट शक्मयता आहे. ब्रिटनच्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ?Ÿस्ट्राझेनेका कंपनीने या लसीची निर्मिती केली आहे. भारतामध्ये सीरम इन्स्टिटय़ूट त्याचे उत्पादन करत असून कोव्हिशिल्ड या नावाने मानवी चाचण्या झाल्या आहेत.
पुढील आठवडय़ात ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डच्या या लसीला मंजुरी मिळण्याची शक्मयता आहे. त्यानंतर भारतामध्येही कोविड 19 प्रतिबंधक समितीचे तज्ञ त्याचा आढावा घेऊन भारतामध्येही आपत्कालीन वापरासाठी लसीच्या वापराला मंजुरी देऊ शकतात, असा अंदाज वर्तवला जात आहे.
सीरमच्या कोविशिल्ड सोबतच भारत बायोटेक आणि फायझर कंपनीकडून देखील तातडीच्या वापरासाठी परवानगी द्यावी यासाठी अर्ज करण्यात आला आहे. दरम्यान, भारत बायोटेकच्या अद्याप तिसऱया टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू आहेत. तर फायझर कंपनीकडूनही प्रेझेंटेशन अद्याप देण्यात न आल्यामुळे भारतात आपत्कालीन वापरासाठी लस उत्पादक कंपन्यांच्या सुरू असलेल्या स्पर्धेमध्ये आता सीरम बाजी मारू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
मागील आठवडय़ातच सीरमकडून काही आवश्यक अधिकची माहिती देखील पुरवण्यात आली आहे. सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. पुण्यातील या कंपनीने युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्ड आणि अ?Ÿस्ट्राझेनेकासोबत करार केला आहे. आतापर्यंत या कंपनीने लसीचे 40 मिलियन डोस बनवलेले आहेत.