दिवसभरात केवळ 18 हजार 732 रुग्णांची नोंद
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात गेल्या 24 तासात 20 हजारांपेक्षाही कमी कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. तब्बल सहा महिन्यानंतर देशवासीयांना दिलासा देणारी आकडेवारी समोर आली आहे. आता सरत्या वर्षाला निरोप देताना देशातील कोरोनाचा प्रसार आटोक्मयात येताना दिसत आहे.
देशात गेल्या 24 तासांत 18 हजार 732 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णसंख्येमुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 1 लाख 87 हजार 850 इतकी झाली आहे. नवीन रुग्णांबरोबरच देशात 24 तासांत 279 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 1 लाख 47 हजार 622 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 2 लाख 78 हजार 690 रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत 97 लाख 61 हजार 538 जण उपचाराअंती कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या 24 तासात देशभरात 21 हजार 430 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.