आर्टेमिस फाऊल हा 12 वर्षांचा हुशार मुलगा आहे. अनेक गुन्हेगारांना त्याने अत्यंत हुशारीने पकडून दिले आहे. आर्टेमिसचे वडील अचानक गायब होतात. मग त्यांच्या शोधासाठी निघालेल्या आर्टेमिसला अनेक गोष्टींचा उलगडा होतो त्याची कथा आर्टेमिस फाऊल या चित्रपटात पाहायला मिळते. 2001 साली प्रकाशित झालेल्या याच नावाच्या कादंबरीवर हा चित्रपट बेतलेला आहे. केनेथ ब्रनाग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कोनोर मॅकफेरसन आणि हेमिश मॅककोल यांनी पटकथा लिहिली आहे. फेर्डिया शॉ प्रमुख भूमिकेत असून लारा मॅकडोनेल, जोश गॅड, कॉलिन फोरेल यांच्याही भूमिका यात आहेत.
संकलन : अपूर्वा सावंत, मुंबई