ऑनलाईन टीम / गोरखपूर :
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. यातच उत्तर प्रदेश मधील नौतनवा येथील आमदार अमन मणि त्रिपाठी यांच्या सह सात जणांना लॉक डाऊन चे उल्लंघन केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमन मणि त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिगवंत वडीलाच्या कार्याशी संबंधित गोष्टी सांगून पास नसून सुध्दा उत्तराखंड मधील बद्रीनाथ आणि केदारनाथ येथे भेट दिली. तेथील पोलिसांना आपला रुबाब दाखवत त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना रोखून त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांना वैयक्तिक बॉंड वर सोडण्यात आले.
उत्तर प्रदेश सरकारच्या मते त्रिपाठी यांना उत्तर खंडात जायचा अधिकार नव्हता. आमदार अमन मणि त्रिपाठी यांच्या पासमध्ये असे लिहिले आहे की, उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिगवंत वडिलांच्या कार्यासाठी आमदार बद्रीनाथधाम येथे जातील. यानंतर केदारनाथ येथून जातील हे समजल्यावर योगी यांचे भाऊ महेंद्र सिंह बिष्ट यांनी राग व्यक्त केला.