प्रतिनिधी / म्हापसा
डिचोली येथील उद्योजक अब्दूल रझाक व वनडिचोली येथील सिद्धीविनायक मंदिर समितीचे अध्यक्ष अमित कासार यांनी रितसर आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. ‘आप’चे संयोजक एल्विस गोम्स यांनी त्यांचा रितसर पक्षामध्ये प्रवेश स्वीकारला. म्हापसा खोर्ली येथील आपच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात दोघांनाही प्रवेश देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सरचिटणीस प्रदीप पाडगावकर, उत्तर गोवा पर्यवेक्षक सुनील सिगनापूरकर उपस्थित होते.
यावेळी संयोजक एल्विस गोम्स म्हणाले की, आप पक्षामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीत उत्कृष्ट प्रशासन करून दाखविले आहे. काल दोन काँग्रेस नेत्याचे दोन पुत्र भाजपात गेले. यावरून आता अन्यकाही काँग्रेसनेते आहे ते पक्षात रहाणार काय हा प्रश्न जनतेसमोर निर्माण झाला आहे. या खोटारडेपणाचा कळस काँग्रसेने गाठल्याने आता नागरिक आम आदमी पक्षाकडे वळू लागले आहे.
फेब्रुवारी 2020 निवडणुका झाल्या आज देशात केजरिवाल सरकार आले त्या आधारे आशेवर आम्ही केजरिवाल सरकारपुढे घेऊन जात आहे. आज युवा पिढी या पक्षात येत आहे. पाच वर्षांना परत जनतेच्या दारात येणार हे राजकारण आता संपत आले आहे. युवा पिढीने आता राजकारणात प्रवेश केल्याने आम आदमी पक्षाला वेगळे स्वरुप आले आहे. उद्या जरी निवडणुका झाल्या तरी आम आदमी पक्ष निवडणुकीला सज्ज आहे. आम्ही ग्रास रुट लेव्हलवर काम करीत आहोत. जनतेच्या संपर्कात आहोत. आज जनतेच्या आरोग्याकडे लक्ष देण्यापेक्षा भाजप सरकारला इतर पक्षाचे नेते आमदार भाजपात कसे प्रवेश करणार याचे अधिक पडले आहे. जनता समजदार असून सर्वकाही खुल्या डोळय़ांनी पाहत आहे. योग्यवेळी योग्य परीने जनता त्यांना ऐन निवडणुकीवेळी धडा शिकविणार आहे अशी माहिती एल्विस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत दिली.