प्रतिनिधी/ सातारा
सातारा पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱयांच्यामध्ये बदल्या झाल्या आहेत. काहींच्याकडून टेबले काढून दुसरे टेबल दिले आहेत. नगराध्यक्षांचे काही काळ पीए म्हणून काम केलेले अरविंद दामले यांच्याकडे शहराच्या वसुलीचा पदभार दिला आहे. तर नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सभा सचिव म्हणून काम पाहिलेले अतुल दिसले यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यासह इतरही विभागात अनेक बदल करण्यात आले आहेत.
सातारा पालिकेत पदाधिकारी बदलले. त्यानुसार अधिकाऱयांची आणि कर्मचाऱयांचीही खांदेपालट नुकतीच झाली आहे. शहराची यावर्षी वसुली चांगली झाली पाहिजे. दिलेल्या उद्दीष्टापर्यंत गेल्याशिवाय नागरिकांना मुलभूत सुविधा देता येणार नाहीत हाच विचार अधोरेकित करत पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी काही अदलाबदल घडवून आणले. पालिकेत सिनीअर असलेले अरविंद दामले यांनी अनेक पदावर काम केले आहे. त्यामुळे त्यांना वसुली विभागाच्या अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे. शहरात 38 हजारहून अधिक मिळकताधारक आहेत. काही मिळकतदार हे आपली प्रापर्टीला कुलूप लावून गेले आहेत. तर काही शासकीय मिळकतदारही थकबाकीदार आहेत. मोठया समजल्या जाणाऱया मिळकतदारांची थकबाकीही मोठी आहे. वसुली चांगल्या प्रकारे करण्यासाठी रांगडाच गडी असणे गरजेचे आहे. हळव्या मनाच्या अधिकाऱयाची गरज नाही अशी वारंवार निकड भासत आली आहे. दामले यांच्याकडे पदभार दिल्याने वसुली विभागही पुन्हा ऍक्टीव्ह झाला आहे. गतवर्षी हिमाली कुलकर्णी यांच्याकडे होता. त्यापूर्वी वणवे यांच्याकडे होता. तसेच सभासचिव म्हणून आलेले अतुल दिसले यांची बदली नगराध्यक्षा माधवी कदम यांचे स्वीय्य सहाय्यक म्हणून घेण्यात आले आहे.
आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठय़ात ही होणार बदल
आरोग्य विभाग आणि पाणी पुरवठा विभागातही काही कर्मचारी आणि अधिकाऱयांची बदली होण्याची शक्यता आहे. काही दिवसात त्याही विभागात जे इतर विभागात कर्मचारी आहेत. त्यांची बदली होण्याची शक्यता आहे.