नवी दिल्ली
भारतीय वाहन उद्योगाच्या निर्यातीत 2021 च्या पहिल्या सहामाहीत लक्षणीय वाढ झाली आहे. सात वर्षाच्या दीर्घ कालावधीत निर्यातीत उत्तम प्रगती दिसली असल्याची बाब व्यापार, उद्योग व उर्जा क्षेत्राशी संबंधित मंत्रालयाने नुकतीच स्पष्ट केली आहे. निर्यात पहिल्या सहा महिन्यात 49 टक्के वाढून 23.61 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. वर्षाच्या आधारे ही वाढ नोंदली गेली असून यापूर्वी 2014 मध्ये 25.23 अब्ज डॉलर्सची निर्यात करण्यात आली होती. उत्तर अमेरिका (39 टक्के), युरोप (56 टक्के) व पूर्व युरोप (80 टक्के) यांनी यात मोठा वाटा उचलला आहे. म्हणजेच या देशांना मोठय़ा प्रमाणात 6 महिन्यात निर्यात करण्यात आली आहे. यासोबत मध्य आशिया, लॅटीन अमेरिका, आफ्रिका, ओशीयाना व आशिया या देशांनादेखील निर्यात वाढली आहे. कोरीयन स्थानिक कंपन्यांना निर्यातीत अडचणी जाणवल्याने भारताला याचा लाभ उठवता आल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.