ब्रिजटाऊन (बार्बाडोस) / वृत्तसंस्था
इंग्लंडचा आघाडीचा फलंदाज इयॉन मॉर्गन विंडीजविरुद्ध टी-20 मालिकेतील शेवटच्या 2 सामन्यात दुखापतीमुळे खेळू शकणार नाही, अशी घोषणा इंग्लंड क्रिकेट मंडळाने केली. मॉर्गन यापूर्वी 5 सामन्यांच्या या मालिकेतील तिसऱया सामन्यात देखील उजव्या पायाला वेदना जाणवत असल्याने खेळू शकला नव्हता. सराव सत्रावेळी त्याला वेदना जाणवल्या. मॉर्गनच्या गैरहजेरीत अष्टपैलू मोईन अलीने त्यावेळी नेतृत्वाची धुरा सांभाळली. इंग्लंडचा संघ या मालिकेत तूर्तास 1-2 फरकाने पिछाडीवर असून दोन्ही संघ उद्या (रविवार दि. 30) चौथ्या सामन्यात पुन्हा एकदा आमनेसामने भिडणार आहेत.