क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव येथील आराधना स्कूल येथे स्पेशल ऑलिंपिक भारत नॉर्थ झोन कर्नाटकाच्या विभागीय संचालिका भारती कोठारी यांनी भेट देवून विद्यार्थ्यांची विचारपूस केली.
मुख्याध्यापक गजानन सुतार यांनी भारती कोठारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासाबाबत भारती कोठारींनी समाधान व्यक्त केले. येत्या 7 एप्रिल रोजी देशभर सर्वत्र स्पेशल ऑलिंपिक भारत याचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले. हुबळी येथे होणाऱया कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही त्यांनी दिले. तसेच भविष्यात विशेष मुलांना स्पेशल ऑलिंपिकसाठी विभागिय स्तरावर विद्यार्थ्यांचे शिबिर घेवून तयार करणार असल्याचे सांगितले. यावेळी शाळेचे क्रीडा शिक्षक रसिद भाई व शाळेचे शिक्षकवर्ग उपस्थित होते.