कित्तूर सैनिक शाळेत 49 विद्यार्थिनींना कोरोना : अथणी, निपाणी येथेही मोठय़ा प्रमाणात लागण
प्रतिनिधी /बेळगाव
सोमवार दि. 17 जानेवारीपासून पहिली ते नववीपर्यंत शाळा सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. कित्तूर व बेळगाव येथील काही शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे शाळांना सुटी देण्यात आली होती. शिक्षण संस्थांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला असून बेळगाव, कित्तूर, अथणी, निपाणी येथे विद्यार्थ्यांना मोठय़ा प्रमाणात लागण झाली आहे. जिल्हय़ात रविवारी 569 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कित्तूर येथील राणी चन्नम्मा सैनिक शाळेतील 49 विद्यार्थिनींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गेल्या आठ दिवसांत या शाळेतील 190 हून अधिक विद्यार्थिनी व शिक्षकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामुळे सध्या सैनिक शाळेला प्रशासनाने सुटी दिली आहे. वसतिगृहातील विद्यार्थिनींना घरी पाठविण्यात आले आहे. जिल्हय़ात 350 हून अधिक विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याची माहिती मिळाली आहे.
वैद्यकीय महाविद्यालये, शाळा-कॉलेज, परिवहन मंडळातील कर्मचारी, पोलीस दलातील अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. बेळगाव येथील जिल्हा सशस्त्र दलाच्या हेडक्वॉर्टरमधील तिघा जणांना, सीआरपीएफच्या एका जवानाला कोरोनाची लागण झाली आहे. खासगी व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि परिचारिकांचाही बाधितांच्या यादीत समावेश असून कॅम्पमधील दोन शिक्षण संस्थांतील पाच विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
अथणी येथील एका पदवीपूर्व कॉलेजच्या आणखी 20 हून अधिक विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून निपाणी येथील एका कॉलेजमधील 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासनाने पोलीस दलात सरसकट स्वॅब तपासणी सुरू केल्यामुळे पोलिसांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले असून जिल्हा पंचायतसह काही सरकारी कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱयांचीही तपासणी करण्यात येत आहे.
बैलहोंगल तालुक्मयातील इंचल मेडिकल कॉलेजमध्येही काही विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली असून तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर अनेक शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांची तपासणी झाली आहे. रविवारी बेळगाव जिल्हय़ात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. या संख्येने 500 चा आकडा पार केला आहे. 569 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 289 जणांचा समावेश आहे. शहर व उपनगरातील 263 व ग्रामीण भागातील 26 जणांचा समावेश आहे.
हुलीकवी, भेंडीगेरी, मच्छे, पंतबाळेकुंद्री, हुंचेनहट्टी, करडीगुद्दी, कडोली, काकती, कलखांब, मुतगा, कंग्राळी खुर्द, कंग्राळी बी. के., संतिबस्तवाड, सुळेभावी, माविनकट्टी, येळ्ळूर, उद्यमबाग, टिळकवाडी, गुरुप्रसाद कॉलनी, सहय़ाद्रीनगर, मंडोळी रोड, वीरभद्रनगर, आदर्शनगर वडगाव, आनंदवाडी शहापूर, अनगोळ, अंजनेयनगर, शिवाजीनगर, अयोध्यानगर, आझादनगर, आझमनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भडकल गल्ली, भाग्यनगर, कॅम्प, चव्हाट गल्ली, चौगुलेवाडी, क्लब रोड, कॉलेज रोड, गणपत गल्ली, गणेशपूर, मजगाव, गोंधळी गल्ली, श्रीनगर, विजयनगर हिंडलगा, हनुमाननगर, हिंदवाडी, कुमारस्वामी लेआऊट, कुवेंपूनगर, महाद्वार रोड, महांतेशनगर, माळमारुती, नार्वेकर गल्ली बेळगाव, नेहरुनगर, न्यू वंटमुरी, ओमनगर खासबाग, सिंधी कॉलनी, रामलिंगखिंड गल्ली, रामतीर्थनगर, सदाशिवनगर, सहय़ाद्रीनगर, शाहूनगर, संगमेश्वरनगर, शांतीनगर, शिवबसवनगर, शास्त्राrनगर, सुभाषनगर परिसरात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.