प्रतिनिधी / बेळगाव
ए. एम. शेख होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल ऍण्ड पीजी रिसर्च सेंटरच्यावतीने 2020-21 साठी पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या बॅचसाठी प्रेशर्स डे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बिम्सचे संचालक डॉ. विनय दास्तीकोप उपस्थित होते. आयसीएमआर बेळगावचे संचालक देवप्रसाद चट्टोपाध्याय अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमास शेख ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सचे अध्यक्ष डॉ. अबू शेख, शेख ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्सचे सेपेटरी डॉ. सबीना, डॉ. एम. जे. अत्तार, मुख्य समन्वयक डॉ. सी. एम. मुगी, प्राचार्य ए. एम. शेख, होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, डॉ. सईद अहमद, उपप्राचार्य आणि डॉ. नकुल काकडे व प्राध्यापक उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सुरभी यांच्या स्वागतगीताने झाली. नवीन विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना होमिओपॅथिकच्या व्याप्तीबद्दल माहिती देण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. विनय दास्तीकोप यांनी महाविद्यालयाच्या शिस्तबद्ध कार्याचे कौतुक केले. शिकवणीचे महत्त्व वर्गात असते. तोलामोलाचा आणि वरिष्ठांशी संवाद साधतो पण त्यापेक्षा स्वतःसाठी सर्व उत्तरे शोधण्यात उत्सुकता असते, असे त्यांनी सांगितले. डॉ. अबू शेख आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना उद्देशून म्हणाले, होमिओपॅथीच्या कार्यक्षमतेविषयी जागरुकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोकांची संख्या आता होमिओपॅथिककडे वळली आहे. विद्यार्थ्यांनी पुढील साडेपाच वर्षांत मोठय़ा संख्येने समर्पण व उत्साहाने समाजाची सेवा करण्यासाठी संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.