लोणंद / वार्ताहर :
शेरेचीवाडी ता. फलटण येथील युवकाचा दोन भावांनी सालपे ता. फलटण गावच्या हद्दीत लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करुन खून केला. बापू संभाजी निकम (वय 38) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.
याबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास सालपे ता. फलटण गावच्या हद्दीत लोणंद ते सातारा जाणाऱया रोडवर एका पिंपळाच्या झाडाजवळ बापु निकम याला गौरव संजय जगताप व त्याचा भाऊ सौरव संजय जगताप दोघे रा. सालपे ता. फलटण यांनी अज्ञात कारणावरुन लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करुन खून केला. या घटनेची फिर्याद शामराव कोंडिबा कणसे यांनी लोणंद पोलीस स्टेशनमध्ये दिली असून, दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही संशयित आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.